बीड (रिपोर्टर): सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती कुठे बरळला तर संपुर्ण समाजाला दोषी धरायचे,या समाजा विषयी इतर जाती,धर्मांमध्ये विष पेरायचे. इतिहासातील कुठले तरी संदर्भ उकरुन आजच्या निरपराध ब्राह्मण समाजाला गुन्हेगार समजायचे. असे जे कट कारस्थान काही राजकिय लोक करत आहेत ते बंद करावे यासाठी बीड शहरातील ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत शांततेमध्ये सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीचा,पक्षाचा निषेध करण्यात आला नाही. आमचा विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे अशी भूमिका या प्रसंगी समाजाच्या वतीने मांडण्यात आली.हे पहिले आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले आहे. या पुढे जर असेच जातीयवादी विष कुणी पेरण्याचा प्रयत्न केला तर मग तो ब्राह्मण समाजातील असो वा इतर कोणत्या समाजातील. त्याच्या विरुध्द बीडमध्ये या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या सत्याग्रह आंदोलनाला ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. पहिल्यांदाच बीडमध्ये ब्राह्मण समाजाच्या आंदोलनाला समाजाचे पत्रकार,संपादक सहभागी झाल्यामुळे या आंदोलनाने अनेक आदर्श प्रस्थापित केले. अलीकडच्या काळात काही राजकिय पक्षाच्या लोकांनी ब्राह्मण समाजाचा घोर अपमान केलेला आहे. कुचेष्टा केलेली आहे. मंत्रोच्चाराचा (पान 7 वर)
अपमान केला आहे. तरी सुध्दा अशा कोणत्याही व्यक्तीचा किंवा त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख कालच्या आंदोलनात कोणीही केला नाही.कोणाचेही फोटो लावले गेले नाहीत. कोणाच्याही विरुध्द घोषणाबाजी झाली नाही. कोणाच्याही विरुध्द कारवाई करण्याची मागणी किंवा तसे निवेदन देण्यात आले नाही. कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलला म्हणून आपणही जर वाईट बोललो तर शाब्दिक युध्द सुरु होते, वाद चिघळतो.त्यामुळे कालच्या आंदोलनात कोणीही व्यक्तीगत टिका,टिप्पणी केली नाही. जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर,अशोक देशमुख, सतीश पत्की,दिलीप खिस्ती,संतोष मानूरकर, प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे या सर्व पत्रकारांनी समाजहिताची भूमिका मांडताना जातीय विष पेरणार्या लोकांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. हे पहिले आंदोलन असल्याने शांततेत करण्यात आले. या नंतर जर असेच प्रकार सुरु राहिले तर आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे ब्राह्मण समाजातील एखाद्या व्यक्तीने जर विनाकारण कुठल्या जाती,धर्माबद्दल ,महापुरुषांबद्दल,देशाबद्दल गैरउद्गार काढले तर त्याचा सुध्दा बीडमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
ॠरपशीह