Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईममाजलगावमध्ये हातभट्टीवर धाड

माजलगावमध्ये हातभट्टीवर धाड

बीड (रिपोर्टर):- माजलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाच्या शेतात सुरू असलेल्या एका हातभट्टीवर पोलीसांनी धाड टाकून 400 लीटर हातभट्टी दारू नष्ट केली.


माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपुर येथे ऊसाच्या शेतात हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती बीट अंमलदार भागवत शेलार यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह तेथे धाड टाकली असता 400 लीटर हातभट्टी दारू मिळून आली. ही दारू नष्ट करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जोनवळ, पीएसआय दाभाडे, बीट अंमलदार भागवत शेलार, चौव्हाण, म्हेत्रे यांनी आज दुपारी 12.30 वाजता केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!