20 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान; आठ ते नऊ हजार कॅरेट जळून खाक
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय, आज सकाळी घडली घटना
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील भाजी मंडई परिसरात असलेल्या फळाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, लवकर आटोक्यात आली नाही, आगीमध्ये गोडाऊनमधील आठ ते नऊ हजार कॅरेट जळून खाक झाले. इतरही साहित्याचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसकिॅटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. आगीत जवळपास 20 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
भाजी मंडई परिसरामध्ये समीर बागवान व त्यांच्या सहकार्यांचे फळाचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनला सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आग लागली. आग लागल्याची माहिती बागवान व त्यांच्या सहकार्यांना झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते मात्र आग लवकर आटोक्यात येऊ शकली नाही. आगीत गोडाऊनमधील आठ ते नऊ हजार कॅरेट व इतर साहित्य जळून खाक झाले. या दुर्दैवी घटनेत 20 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. या घटनेने व्यापार्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.