Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडफेसबुकवर पुन्हा एकदा धनुभाऊंचीच हवा!

फेसबुकवर पुन्हा एकदा धनुभाऊंचीच हवा!


पंकजाताईंचे दसरा मेळाव्यातील भाषण पाहिले 33 हजार लोकांनी तर धनंजय मुंडेंची पत्रकार परिषद 22 तासात 1.75 लाख लोकांपर्यंत…
मुंबई (रिपोर्टर)-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यातील राजकीय युद्ध समाजमाध्यमांमध्ये देखील तितकेच चर्चेत असते. त्यातच काल पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण व त्यांनतर काही वेळाने धनंजय मुंडे यांनी घेतलेली पत्रकार परिषद यांच्या फेसबुक वरील व्हीडिओची टीम लय भारीने तुलना केली असता, धनुभाऊंचीच फेसबुकवर ’हवा’ आहे हे दिसून येते.
दसरा मेळाव्याला आता जवळपास 24 तास उलटत असून आतापर्यंत पंकजाताई मुंडे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील भाषणाचा व्हीडिओ 33 हजार लोकांनी पाहिला आहे. तर तद्नंतर धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे त्यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. हा व्हीडिओ जवळपास 22 तासांमध्ये 1 लाख 75 हजार लोकांनी पाहिला आहे.

dm
dm1


विविध वृत्तवाहिन्यांचे पोर्टल्स, फेसबुक पेज, युट्युब चॅनल्स असा आणखी सविस्तर सर्व्हे केला असता धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेला 22 तासात जवळपास 11 लाख लोकांनी पाहिले आहे तर पंकजाताई मुंडे यांच्या भाषणाला एकूण समाज माध्यमांमध्ये 4 ते 4.5 लाख लोकांनी पाहिले आहे. यातून समाजमाध्यमांध्ये जास्त पसंती धनंजय मुंडे यांना मिळत असल्याचे दिसून येते.
दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे काम ’हवे’ तसे करता आले नाही असे म्हणत आपल्या अपयशाची एकप्रकारे कबुली देणे आणि आपल्या पक्षातील नेते मंडळींना सरकार पाडण्याच्या गोष्टी बंद करा, असा घरच्या आहेरवजा सल्ला दिल्याने विरोधकांसह स्वकीयांकडूनही पंकजा मुंडे यांना ट्रोल करण्यात येत आहे.तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला आपण गती दिली असून, आता ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला गती मिळत असून कामगारांची नोंदणी करत ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले. दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान व्यसनमुक्ती बाबत गावोगाव काम करणार असल्याच्या पंकजताईंच्या घोषणेचे सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्याने आपण स्वागत करतो व त्यांचे या कामासाठी आभार मानतो असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्यातील समंजसपणा तर दाखवून दिलाच आहे तसेच त्यांचे हे सकारात्मक राजकारण सिद्ध करणारे वक्तव्य चर्चेचा विषय देखील बनले आहे.

Most Popular

error: Content is protected !!