वडवणी शहरासह पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन
वडवणी (रिपोर्टर):- मनोज जरंगे पाटील यांच्या अमरण उपोषणाच्या सन्मानार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या एकमेव मागणीसाठी आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह अन्य पाच ठिकाणी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाचे लक्षवेधून घेतले आहे.तर तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलानामुळे
वाहतुक पूर्णत ठप्प झाली होती.तर जरंगे यांच्या अमरण उपोषणाच्या सन्मानार्थ अण्णासाहेब लांडे पाटील हे कालपासून वडवणी तहसिल समोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी कि, बीड जिल्हा सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलनाची हाक दिली असल्याने आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा समाज एकत्र येत रस्तारोको केला. तर वडवणी – तेलगांव राज्यमहार्गावरील मोरवड फाटा, पुसरा फाटा तसेच कुप्पा फाट्यावर जबरदस्त मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन पार पडले. तर ग्रामीण भागातील देवडी फाटा व चिंचवण याठिकाणी देखील रस्तारोको संपन्न झाला. यावेळी जय जिजाऊ,जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासह सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या आहेत. सदरील रस्तारोको हा तब्बल तीन तास चालाल्याने वाहतुक पुर्णपणे बंद असल्याने याकाळात प्रवाशाना देखील थांबावे लागले आहे. तर वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मराठा समाजावर आरक्षणाचा कसा परिणाम होतो.समाजाची शैक्षणिक हानी कशी होते. आरक्षणाचा लाभ घेतल्यास काय होते आणि काय होत नाही ? यासह समाजिक परस्थितीवर अनेक मान्यवरांनी भाष्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी देखील दोषीवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.तर तालुक्यात झालेल्या रस्तारोको आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झाले असुन पोलीसांकडून देखील चोख बंदोबस्त देण्यात आला होता. तर या आंदोलनातील मागण्याचे सामाज बांधवाच्या वतीने तहसिलदार संभाजी मंदे यांनी निवेदन स्विकारले आहे.तर जरंगे यांच्या उपोषणाच्या सन्मानार्थ वडवणी तहसिल कार्यालया समोर अण्णासाहेब लांडे पाटील हे कालपासून अमरण उपोषणाला बसले आहेत. तर समाज बांधव देखील या उपोषणाला भेट देत आहेत.
अमन सिरसट यांचे नियोजन
मराठा समाजाच्या आंदोलनाची धग आणि तिव्रतेवर वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमन सिरसट हे विशेष लक्ष ठेवून होते. आजच्या आंदोलनात देखील अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपुर्ण स्टाफसह विशेष पोलीसाची तुकडी पाचारण केली होती.जागोजागी पोलीस बंदोस्त देण्यात आला होता. तर प्रत्येक गोष्टीवर पोलीसाची नजर असल्याची दिसून आले असल्याने एपीआय अमन सिरसट यांचे योग्य आणि उत्कृष्ट नियोजन यामाध्यमांतून दिसून आले आहे.