बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. आज सकाळी नायगाव मयूर येथील गोविंद औटे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदरील तरुणाकडे कर्जही होते. तरुणाच्या या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहेत.










