Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपाण्यात बुडून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

पाण्यात बुडून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

बिंदुसरा धरणात दोघांचा तर गोदावरी पात्रात एकाचा मृत्यू


बीड (रिपोर्टर)- पोहण्यासाठी गेलेल्या दोन 16 वर्षीय मुलांचा बिंदुसरा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. मुले घरी आले नसल्याने याबाबतची तक्रार नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. पोलिसांनी याचा तपास केला असता सदरील मुलांची दुचाकी बिंदुसरा तलावाच्या जवळ आढळून आली. पोलिसांनी काही लोकांच्या मदतीने मध्यरात्रीच्या दरम्यान या मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. हे मुले शाहूनगर परिसरातील शिंदेनगर येथील होते. या घटनेबद्दल परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गोदावरी पात्रात एका 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
ओंकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिवसंतोष पिंगळे (वय 16) दोघे राहणार शिंदेनगर कॅनाल रोड बीड हे दोघे काल दुपारी दुचाकीवर बिंदुसरा धरणावर गेले होते. मुले घरी आले नसल्याने याबाबतची तक्रार रात्री दहा वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. पोलीसांच्या तपासामध्ये मुले धरणावर गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले होते. पोलीसांना मुलांची दुचाकी तलावाच्या जवळ आढळून आली. मुलं पाण्यात बुडाली असावीत, असा अंदाज आल्यानंतर काही लोकांच्या मदतीने पाण्यामध्ये शोध घेतला असता या दोघांचे मृतदेह आढळून आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या प्रकरणी प्रथमदर्शनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दुर्दैवी घटनेने शाहूनगर परिसरामध्ये हलहळ व्यक्त केली जात आहे.


गोदावरी नदी पात्रात 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

goda


गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील उमेश लिंबाजी आरबड (वय 17) हा मुलगा गोदावरी नदी पात्रात आज सकाळी अंघोळ करण्यासाठी गेला होता. अंघोळ करताना पाय घसरून तो गोदावरी नदी पात्रात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुलाला वाचवण्याचा उपस्थितांनी प्रयत्न केला मात्र त्याला पाण्याबाहेर काढले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Most Popular

error: Content is protected !!