आरक्षण द्या, नसता पराभवाला तयार रहा;धनगर समाजाचा इशारा
पुणे (रिपोर्टर): आमचे सरकार येताच पहिल्या कॅबिनेट बैंकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. हे आश्वासन देऊन आज कित्येक वर्षे उलटले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे समाजात मोठा असंतोष असून सरकारच्या निष्क्रिीय भूमिकेविरोधात आज यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात पुण्याच्या बालगंधर्व नाट्य मंदिरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
निवडणुकीदरम्यान केवळ मतांचा गठ्ठा आपल्याला मिळावा या स्वार्थापोटी नेते आश्वासने देतात. मात्र सत्तेत आल्यानंतर न्यायीक कामाकडेही दुर्लक्ष करतात. गेल्या आठ वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले मात्र ते आजपर्यंत पाळले नाही, त्यामुळे धनगर समाजात प्रचंड असंतोष आहे. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात पुणे येथे बालगंधर्व नाट्य मंदिरासमोर मोठे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असेल्या धनगर समाज बांधवांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलनाचा बेलभंडार उधळला. धनगर समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही तर हे आंदोलन अत्यंत तिव्र टोकाचं करण्यात येईल आणि 2024 मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय सत्ताधार्यांना येईल, अशा आशयाचा इशारा भारत सोन्नर यांनी दिला.