Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईममादळमोहीत तरुणावर जीवघेणा हल्ला शिष्टमंडळाने घेतली एसपींची भेट

मादळमोहीत तरुणावर जीवघेणा हल्ला शिष्टमंडळाने घेतली एसपींची भेट

बीड (रिपोर्टर)- कुंभारवाडी येथून मादळमोही येथे सामान खरेदीसाठी निघालेल्या कृष्णा बबन पायघडे याला अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मादळमोही येथे घडली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आज एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडेकेली आहे.


   याबाबत अधिक असेकी, गेवराई तालुक्यातीलकुंभारवाडी येथील कृष्णा बबन पायघडे हे 23 ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडी येथून मादळमोही येथे सामान खरेदीसाठी गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी त्यांना धारदार शस्त्राने मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून डोक्याला दहा टाके पडले आहेत. मादळमोही परिसरात सातत्याने गुंडप्रवृत्तीचे लोक विनापरवाना शस्त्र बाळगून सर्वसामान्यांवर हल्ला चढवतात. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या हल्ल्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावे, अशा आशयाची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे आज भागवत पायघडे, सुभाष कबाडे, कृष्णा जाधव, महादेव जाधव, प्रमोद जाधव, अशोक सरडे, अशोक जाधव यांच्यासह आदींनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!