Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईअंबाजोगाईमध्ये काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन शहरातून भव्य रॅली काढून प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्वागत

अंबाजोगाईमध्ये काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन शहरातून भव्य रॅली काढून प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्वागत


अंबाजोगाई (रिपोर्टर)ः- अंबाजोगाई शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे आलेले आहे. पटोले यांच्या स्वागतासाठी शहरातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी भव्य दिव्य रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलं. राजेसाहेब देशमुख यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यादांच हा कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

248281712 895621304717384 1420763047286944200 n

नाना पटोले काय बोलातयात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बीड जिल्ह्यात काँग्रेसला मरगळ आलेली असतांनाच काँग्रेसच्या जिल्ह्याची जबाबदारी माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली. देशमुख जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी कंबर कसली. आज अंबाजोगाई शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आलेले आहेत. पटोले यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. दुपारी 1 वाजता कार्यकर्ता मेळाव्याला सुरूवात झाली होती. या मेळाव्याला खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, माजी आमदार सिराज देशमुख यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यासाठी जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
राजेसाहेब देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य आले आहे. आज अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतीक सभागृहात कार्यकर्ता मेळावा होत असल्याने या मेळाव्यात भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!