बीड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे समाज मंदिराच्या जवळच अनाधिकृतपणे दारुची विक्री होऊ लागली. या दारु विक्रीमुळे गावात अशांतता निर्माण होऊ लागली. दारु विक्रेत्यांना दिंद्रुड पोलिस पाठिशी घालत आहेत. याची दखल वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घेऊन दारू विकणार्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाभळगाव येथे अनाधिकृतपणे दारूची विक्री होऊ लागली. गावात दारू मिळू लागल्याने अनेक तरुण व्यसनाच्या आधीन गेले आहेत. दारूमुळे गावातील शांतता भंग होऊ लागली. मद्यपींमुळे महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. दिंद्रुड पोलिसांना दारू विक्रीबाबत माहिती असतानाही ते दारू विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. या प्रकरणाची दखल जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी घेऊन दारू विक्री करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.