शिरूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील प्रकार
शिरूर कासार (रिपोर्टर)- तालुक्यातील टेंभूर्णी येथील विद्यमान सरपंचाने बनावट कागदपत्र आणि दुसर्या व्यक्तीचे नाव वापरून निवडणूक लढविली असल्याची तक्रार प्रकाश ढगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकार्यांना योग्य ती कार्यवाही करण्यासह केलेल्या कार्यवाहीची माहीती अर्जदार यांना परस्पर कळविण्याविषयी आदेश दिले आहेत.टेंभूर्णीच्या सरपंचांनी बनावट कागदपत्र वापरून निवडणूक आयोगाची दिशाभूल केली असून या प्रकरणी आपण पाठपुरावा करणार असल्याचे देखील अर्जदार प्रकाश ढगे यांनी सांगितले आहे.
ग्रामसेवकाला आदेश दिले सदरील माहिती देण्याचे काम हे निवडणुक विभागाचे आहे.जिल्हाधिकारी यांच्या प्राप्त पत्रानुसार मी टेंभूर्णीच्या ग्रामसेवकाला संदर्भिय अर्जाच्या अनुषंगाने कागदपत्र संकलित करण्याचे आदेश दिले असून तशा आशयाचे पत्र देखील देणार आहे.
सचिन सानप
-गटविकास अधिकारी, शिरूर
माहिती अधिकारात माहिती मागितली
बनावट कागदपत्रासंदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे माहिती मागितली असून मला सदरील माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.माहिती अधिकारात सत्यभामा रोकडे यांचा निवडणुक नामनिर्देशन अर्ज,जातीचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,पॅन कार्ड,बेबाकी प्रमाणपत्र,आप्त्य दाखला आणि सर्व शपथपत्रासह सत्यभामा नाव असल्याचे शपथपत्र आणि टेंभूर्णी गावाची 2022 ची मतदार यादी अशी माहिती मागितली आहे.