Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedशिस्तीत राहा, मास्क लावा, गळ्यात ओळखपत्र ठेवा

शिस्तीत राहा, मास्क लावा, गळ्यात ओळखपत्र ठेवा

डॉ.साबळे भल्या सकाळीच गेटवर; अधिकारी-कर्मचार्‍यांना सूचना
बीड (रिपोर्टर)- कोरोना बाबतची सतर्कता आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह रुग्ण व नातेवाईकांना शिस्त लावण्याहेतू आज थेट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे आज भल्या सकाळीच रुग्णालयाच्या गेटवर थांबले. येणार्‍या कर्मचार्‍यांना मास्क लावण्याबाबत सूचना करत उद्यापासून रुग्णालयात यायचे आहे तर तोंडाला मास्क आणि गळ्यात ओळखपत्र बंधनकारक असल्याचे सुनावत हे नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा दम देत रुग्णालयाच्या आवारात येणार्‍या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचनाही डॉ. साबळे यांनी दिल्या.


जिल्हा शल्यचिकित्सक पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून डॉ. सुरेश साबळे जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेत खंड पडणार नाही, रुग्णांसह नातेवाईकांना हालअपेष्या सहन कराव्या लागणार नाहीत, त्याचबरोबर रुग्णाला इतरत्र रेफर करण्याची वेळ येणार नाही याची तजवीज घेत डॉ. साबळेंनी जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालयात डॉ. कर्मचार्‍यांना काम करण्यास भाग पाडले आहे. कोरोना संसर्ग कमी होत असला तरी सावधगिरी म्हणून शासनाच्या निणयमानुसार किती कर्मचारी मास्क लावून रुग्णालयात येतात हे तपासण्यासाठी आज भल्या सकाळीच डॉ. साबळे रुग्णालयाच्या गेटवर येऊन थांबले. रुग्णालयात येणार्‍या अनेक कर्मचार्‍यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे पाहून आणि गळ्यात ओळखपत्र नसल्याचे पाहून डॉ. साबळेंनी कर्मचार्‍यांना असले नाटके चालणार नाहीत, शिस्तीत या, शासनाच्या नियमानुसार तोंडाला मास्क लावा, गळ्यात ओळखपत्र ठेवा, ज्या अधिकारी, कर्मचार्‍यानंी मास्क अथवा ओळखपत्र ठेवले नसेल त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही या वेळी साबळे यांनी दिला. त्याचबरोबर रुग्णालयचाया आवारात येणार्‍या प्रत्येकाची अँटीजेन चाचणी करण्याच्या सूचनाही या वेळी दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्मचार्‍यांसह रुग्णांच्या नातेवाईकांना मास्क व टेस्टशिवाय जिल्हा रुग्णालयाचा परिसर प्रतिबंधित केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!