मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडला असून सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देऊन दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
मराठवाड्यात यंदा कमी पाऊस पडला. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. मराठवाड्यातील शेती उत्पादन निम्म्यावर निघणार असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाने शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी, दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, बीड जिल्ह्यात 25 टक्के पिक विमा सरसकट सर्व शेतकर्यांना त्यांच्या खात्यात जमा करावा, यासह इतर मागण्यांसाठी आज मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, सुमंत धस, वर्षाताई जगदाडे, शैलेश जाधव, अशोक सुरवसे, कैलास दरेकर, सदाशिव बिडवे, रेखा अंबुरे यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.