Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडएसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघेना आंदोलनकर्त्यांनी शासनाचा घातला दहावा

एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघेना आंदोलनकर्त्यांनी शासनाचा घातला दहावा


बीड (रिपोर्टर)- एसटी कर्मचार्‍यांनी गेल्या दहा दिवसांपासून संप पुकारलेला आहे. या संपाबाबत अद्यापही तोडगा निघाला नाही. संतप्त कर्मचार्‍यांनी आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी शासनाचा दहावा घालून निषेध व्यक्त केला आहे.
महामंडळाच्या कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरुच असून या आंदोलनात अनेक कर्मचार्‍यांचा सहभाग आहे.


एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारलेला आहे. या संपाला आज दहा दिवस पुर्ण झाले असून अद्यापही शासनाने संपाबाबत तोडगा काढलेला नाही. आज एसटीच्या कर्मचार्‍यांनी दहाव्या दिवशी शासनाचा दहावा घालून निषेध व्यक्त केला. बीडच्या एसटी महामंडळ कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरुच असून या वेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्णया विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!