Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडधाकट्या पंढरीच्या धारकर्‍यांवर नारायणगडाच्या विकासाची जबाबदारी राजयोग फाऊंडेशनकडून विश्‍वस्तांचा सत्कार

धाकट्या पंढरीच्या धारकर्‍यांवर नारायणगडाच्या विकासाची जबाबदारी राजयोग फाऊंडेशनकडून विश्‍वस्तांचा सत्कार


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा हा संतांच्या पावन स्पर्शाने आणि समाज सुधारकांच्या विचाराने प्रफुल्लित झोला जिल्हा आहे. येथे पंढरीच्या विठ्ठलाचे वारकरी आणि धारकरी भागवद् धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन सत्कार्याला अधिक महत्व देतात. संतांचे विचार अंगीकारून ‘जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपले’ म्हणत ‘तेथीच देव जाणतात’ धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगडाच्या विश्‍वस्तांची नुकतीच निवड झाली. त्या अनुषंगाने सामाजिक कामात अग्रेसर असणारे दिलीप धूत, शुभम धूत यांच्या राज फाऊंडेशनने या विश्‍वस्थांचा हृदयसत्कार करत नारायणगडाच्या विकासाची मोठी जबाबदारी आपल्यावर असून भक्तीची मांदियाळी नारायणगडाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या काना-कोपर्‍यात जावी, अशी इच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्राची धाकटी पंढरी समजल्या जाणार्‍या श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या विश्वस्तपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, पंचायत समिती सभापती बळीराम गवते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सी.ए.जाधव, गोवर्धन काशिद सर यांची काही दिवसांपूर्वीच निवड झाली. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व निवड संपन्न झाल्या. यानिमित्त शुक्रवार दि.12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. सारडा कॅपिटल येथे राजयोग फाउंडेशन च्या वतीने या नूतन विश्वस्तांचा स्नेह सत्कार करण्यात आला.

नारायणगडाची उज्वल अध्यात्मिक परंपरा पुढे घेवून जाताना, नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच विश्वस्तांच्या माध्यमातून विशेष कार्य येत्या काळात होईल अशी खात्री आणि विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. या नूतन विश्वस्तांचा स्नेह सत्कार करुन शुभेच्छा देतांना पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धुत, नगरसेवक शुभम धुत यांच्यासह व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, जवाहरलाल मंत्री, ड. जयप्रकाश चरखा, आत्माराम पवार, सुमंत रुईकर, केदार मानधने, धनंजय वाघमारे, आनंद वाघ, शुभम कातांगळे, अभिजीत आव्हाड, सत्यनारायण करवा, अशोक करवा, पवन शर्मा, शिवाजी कोलगुडे, हुसेन शेख, गिरीश मुंदडा, विक्रम चव्हाण, विशाल वाघमारे, संदीप रसाळ, रुद्र चव्हाण, शुभम पोते, सागर वाहुळ, मेघराज जगदाळे, काशिफ चाऊस, शिवम घाडगे, संकेत करवा, राजदिप धुत, कमलाकर पांडव, सय्यद ताहेर, विलास दातखीळ, सुनील घाटे, परमेश्वर क्षीरसागर, नितीन तिपाले व इतर उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!