मरहट्टा…! मरा तो हटा..!!
जीवंत
मराठ्यांच्या
एकीने सरकारला धडकी
दहा दिवसात आरक्षण द्या नसता पुढची जबाबदारी सरकारची
काय आहेत मनोज
जरांगेंच्या मागण्या?
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणार्या नराधमांना फाशी देण्यात यावी
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांनी सांगितलेला निधी, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी द्यावी
दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
सारथी संस्थेमार्फत पी.एच.डी. करणार्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे.
सराटे आंतरवली (रिपोर्टर)- केंद्र आणि राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे… गोरगरीब मराठा समाजाचे हाल करू नका, दोन्ही सरकारने मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन ओबीसींमधून आरक्षण द्यावे, आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस वाट पाहू शकणार नाही. पाच हजार पुरावे मिळाल्याने आता आरक्षण समितीचे काम बंद करा, असे आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आणखी दहा दिवस शिल्लक आहेत, येथे आलेल्या लाखो मराठ्यांचं एकच मागणं आहे, मराठ्यांना आरक्षण द्या, या दहा दिवसात आरक्षण मिळालच पाहिजे. जर ते तुम्ही नाही दिलं तर चाळीसव्या दिवशी पुढे काय करायचे ते सांगू. त्यानंतर जे काही होईल, त्याला सरकार जबाबदार राहील, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांच्या उपस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारला दिला. जरांगे यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रिय मंत्रिमंडळाचे लक्ष वेधणारे भाष्य केले.
मराठ्यांचा
आग्या मोहोळ
केंद्राला आणि राज्याला सांगतो,
आज मराठ्यांचं ‘आग्या मोहोळ’
शांत आहे, हे ‘आग्या मोहोळ’
एकदा उठलं, तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून देशाला अन्नधान्य पुरवतो. त्यांची लेकरं आरक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. माझंही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, हे गोरगरीब मराठ्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने
मराठा आरक्षण जाहीर करावं,
असंही मनोज जरांगे
म्हणाले.
सभेचे वैशिष्ट्ये….
प्रस्थापीत पुढार्यांना आत्मपरिक्षण करावयास भाग पाडणारी सभा
लाखोंच्या संख्येने येणारे मराठे छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मॉसाहेब, छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत होते.
कुठे टाळमृदंग, कुठे हलगी, कुठे ढोलताशा तर कुठे ‘एक मराठा लाख मराठा’चा जयघोष
मराठे शांततेत आले, शांततेत परतू लागले.
चारही दिशांनी मराठ्यांसाठी जेवण, पाण्याची सोय करण्यात आली होती.
मराठ्यांसह मुस्लिम व अन्य समाजातील बांधवांनी पुढे येऊन मराठ्यांची सोय केली.
जे आज पावेतो कुणालाही जमले नाही ते सर्वसामान्य जरांगेंना जमले.
बेशिस्त वागणार्यांना जागेवर समज दिली जात होती.