Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडउद्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार

उद्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार


बीड (रिपोर्टर)ः- अनेक दिवासाच्या कालखंडानंतर दिवाळीच्यापुर्वी दोन महिन्या अगोदर आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर एक महिन्यांने पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या की, दिवाळीच्या सुट्टया शालेय शिक्षण विभागाने दिल्यानंतर उद्या पासून पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे.
11 नोव्हेंबर पासून महाविद्यालयीन वर्ग सुरू झाले आहेत. याच तारखेपासून दिवाळाच्या सुट्टयानंतर शाळा सूुरू होणार होत्या. मात्र शिक्षक संघटनेच्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर या सुट्टयात वाढ करुन उद्यापासून शाळा सुरू होत आहे. ग्रामीण भागामध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एस.टी.बसने ये-जा करतात. शिक्षक वर्गही शाळेच्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर एस.टी.बस संपाचा परिणाम निश्‍चीत होईल.

Most Popular

error: Content is protected !!