बीड : (रिपोर्टर) उसतोड मजुर गावी परतल्याने आणि त्यांच्या उचली घेणे सुरू झाल्याने मजुर, युवकांना लूटनार्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. बीड शहरासह ग्रामीण भागावात अनेक ठिकाणी ऑनलाईन चक्री मटक्याच्या माध्यमातून राजरोस मजुर, युवकांना लूटीचा गोरख धंदा सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिस अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे विशेष पथके नावालाच आहेत. पोलिस अधिक्षकांच्या आदेशालाही स्थानिक पोलिसांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
शिरूर कासार तालुका हा उसतोड मजुरांचा तालुका म्हणून परिचत आहे. उसतोड मजुर गावी स्थिरावताच उद्योग, व्यवसायास सुगीचे दिवस येतात आणि आर्थीक चक्राला गती मिळते. उसतोड मजुरांमुळे तालुक्यातील सर्व व्यवसायांना बरकत मिळत असली तरी उसतोड मजुरांकडील उचलीवर डल्ला मारणार्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. खरिप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी कृषी निविष्ठांच्या खरेदी विक्रीसाठी शहरात युवक, शेतकर्यांची गर्दी वाढली आहे. खत- बीयानासाठी आनलेल्या पैशाने खिसा गरम असल्याने तरूण या चक्रीमटक्याच्या बुकीकडे आकर्षीत होत आहेत. उसतोड मजुरांच्या उचली सुरू झाल्याने बहूतांश मजुर शहरातील चक्रीमटक्यावर घामाचा पैसा ओतून रिकाम्या हाताने घरी परतत असल्याने परिसरात कौटूंबीक कलहाचे प्रमाण वाढत आहेत. चक्रीमटक्यावर घामाचा पैसा ओतणार्या मजुरांचे आई वडील,पत्नी, मुले यांना त्रास सहन करावा लागत असला तरी कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी उपाय योजनांचा मागमूस नसलेल्या शिरूर पोलिसांना मात्र याचे कसलेही सोयर-सुतक नाही. या उलट पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कक्षेच्या बाहेर असलेल्या खोल्यांमध्ये दिवसभर अवैध धंदेवाल्याचा राबता शहरासह तालुकावाशीय उघड्या डोळ्यांनी पाहून सहन करत आहेत. शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी देखील या चक्रीमटक्याच्या बुकीकडे आकर्षीत होत आहेत. उसतोड मजुर, युवक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनाही या ऑनलाईन चक्री मटक्याची लत लागल्याने युवा पिढी व्यसानाधिनतेच्या आहारी जात असून कष्ठाचा, घामाच्या पैशावर डल्ला मारणारा बुकी चालकाच्या खुशामतीत शिरूर पोलिस मग्न आहेत. प्रत्यक्षात पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांपासून बीट अमलदारांना आपल्या बीटातील खडान् खडा माहिती असतो. मात्र शिरूर बाजारतळावर राजरोस सुरू असलेल्या ऑनलाईन चक्रीमटक्याची भनकही नसावी हे नवलंच.
बुकी भोवती हेरांचा पहारा
शिरुर शहरातील बाजारतळावर सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री मटका बुकीकडे ग्राहका व्यतिरीक्त पोलिस अथवा संशयीत व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने पाळत ठेवण्यासाठी बुकीकडे येणार्या वेगवेगळ्या रस्त्यांवर ठिक ठिकानी शहरातील बेकार तरूणांचा पहारा लावण्यात आला आहे. बेकार तरूणांना पैशासह खान्या पिण्याचे आमिष दाखवून अवैध ऑनलाईन चक्रीमटका बुकीला पहारा लागवणारे बेकार तरूणच भविष्यात या मार्गाचा अवलंब करतील यात शंका नाही.
माहिती घेवून कारवाई
करु- एसपी नंदकुमार ठाकूर
जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कोठे ऑनलाईन चक्री मटका सुरु असेल तर त्याची माहिती घेवून कारवाई केली जाईल. असे रिपोर्टरशी बोलतांना नुतन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.