Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीनरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम,औरंगाबाद, नांदेड, अमरावतीसह बीडच्या वन पथकांचा राना-वणांसह जंगलात पायपीट...

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम,औरंगाबाद, नांदेड, अमरावतीसह बीडच्या वन पथकांचा राना-वणांसह जंगलात पायपीट सुर

, दुपारपर्यंत बिबट्याचा माग नव्हता, ना.मुंडेंनी केले गर्जे कुटुंबियांचे सांत्वन
आष्टी (रिपोर्टर)- नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, नांदेड, अमरावतीसह बीड जिल्ह्यातील वन विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने शोध मोहीम गतीमान केली असून भयभीत झालेल्या नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत बिबट्याला 24 तासात जेरबंद करण्याच्या इराद्याने सर्वजण कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज आष्टीत डेरेदाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तर उपस्थित वनविभागाच्या अधिकार्‍यांना नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आदेश दिले.


नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यात धुमाकूळ मांडला असून गेल्या आठवडाभरात अनेकांवर हल्े करत या बिबट्याने दोघांचा जीव घेतला आहे तर अनेक पाळीव प्राण्यांच्या नरडीचा घोट घेतल्याने या भागात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी आणि नरभक्षक बिबट्याला पकडण्यासठी वनविभागाने वेगवेगळे पथके तयार केले आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील वनविभागाच्या पथकांनी आज सकाळपासून बिबट्याच्या शोधार्थ मोहीम गतीमान केली आहे. किन्ही गावापासून आष्टी तालुक्यातील अन्य बिबट्याचा वावर असलेल्या भागात ही शोध मोहीम सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत बिबट्याचा माग लागलेला नव्हता . दुसरीकडे राज्याचे सामाजिक न्यायमंत्रीत था बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आष्टीत डेरेदाखल झाले आहेत. त्यांनी सुर्डी येथील नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. उपस्थित वन अधिकार्‍यांना नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!