Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडनागनाथ माझा दाजी, माझ्या बहिणीची, लेकरांची जबाबदारी मंत्री म्हणून नाही तर कुटुंब...

नागनाथ माझा दाजी, माझ्या बहिणीची, लेकरांची जबाबदारी मंत्री म्हणून नाही तर कुटुंब म्हणून घेतो -ना.धनंजय मुंडे


आष्टी (रिपोर्टर)- नागनाथ माझा दाजी होता, माझ्या बहिणीची, लेकरांची जबाबदारी मंत्री म्हणून नाही तर हे माझं कुटुंब म्हणून घेतो, असं म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज गर्जे कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी वन अधिकारी तेलंग यांच्या हस्ते कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीचा चेक दिला.

u8


आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील पंचायत समिती सदस्यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. गेल्या आठवडाभरात तालुक्यातील अनेक नागरिकांवर नरभक्षक बिबट्याने हल्ला चढवून जखमी केले आहे. काल किन्ही गावातही एका 12 वर्षीय मुलास फरफटत नेल्याने त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आज पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंनी आष्टी तालुक्यात जाऊन घटनास्थळांची पाहणी केली.

u9

त्याचबरोबर सुर्डी येथे गर्जे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी धनंजय मुंडे म्हणाले, नागनाथ माझा दाजी होता, माझ्या बहिणीची, लेकरांची जबाबदारी मंत्री म्हणून नाही तर हे माझे कुटुंब म्हणून घेतो, या वेळी त्यांच्या सोबत आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. दरेकर नाना, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, सतीश शिंंदे, शिवाजी नाकाडे, शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, सुनील नाथ, शिवाजी शेकडे, आप्पा राख, राम खाडे, शिवाजी डोके, विजय पोटे यांच्यासह आदी उपस्थित होते. त्यानंतर धनंजय मुंडे हे किन्ही या गावी भेट देणार आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!