दोन वर्षापुर्वी गुजरवाडीचा पुल गेला होता वाहून; रात्री जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी गेला वाहून
माजलगाव/पात्रूड (रिपोर्टर) मागील वर्षाच्या पावसाळ्यामध्ये गुजरवाडीच्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडुन पुलाचे आतोनात नुकसान झाले होते. तरी देखिल याकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असुन पावसाच्या आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडुन बाबुराव रामकिसन नरवडे वय 76 वर्ष यांचा मृत्यु झाल्याची घटना गुजरवाडी येथे मंगळवारी ता. 5 रात्री घडली आहे.
तालुक्यातील गुजरवाडी गावाला जोडणार्या रस्त्यावरील पुल मागील वर्षीच्या पावसाळ्यात वाहुन गेलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणाहुन ये – जा करतांना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. या पुलाकडे व गावाकडे मात्र स्थानिक ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मंगळवारी तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे गुजरवाडीच्या नदीला मोठे पाणी आलेले होते तर बाबुराव नरवडे हे पात्रुड येथे काही कामानिमीत्त आले होते. रात्री नउच्या दरम्यान गावी जात असतांना त्यांना या पाण्या अंदाज न आल्याने व खचलेल्या पुलामुळे ते पाण्यात पडले आणि दुर्देवाने त्यांचा बुडुन मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असुन त्यांचा मृतदेह वाहत – वाहत पात्रुड येथील पुलाजवळ आला होता. दरम्यान मागील वर्षभरापासुन पुल खचुन वाहुन गेलेला असतांना देखिल पुलाच्या दुरूस्तीअभावी बाबुराव नरवडे यांचा बळी गेला असल्याने नातेवाईकांतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.