एका एका
शेडवर दोन दोन वेळा लाटले
अनुदान ; खरे लाभार्थी मात्र
वंचित
भागवत जाधव । गेवराई
ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशीला या म्हणीप्रमाणे एकाच रेशीम शेड वर अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन दोन व्यक्तीच्या नावे अनुदान काढून कृषी विभागाने हद्दच केली आहे. अर्धे पैस द्या अन डबल अनुदान घ्या असा अजब फंडाच गेवराई कृषी विभाग व माजलगाव उप विभागाच्या अधिकारी यांनी सुरू करून बोगसगिरीचा कळस गाठला असून याबाबत अनेक तक्रारी असतानाही अद्याप वरिष्ठांकडून साधी चौकशीही होत नसल्याने या साखळीत खालच्या कर्मचार्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत आर्थिक लोण पोहचत असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेचे कर्ज काढून शेड उभारणी केलेली असताना मात्र फक्त आणि फक्त अधिकार्यांना पैसे न दिल्यामुळे ते अनुदानापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
पोखरा योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना आधी स्वतः खर्च करून हा प्रकल्प उभारावा लागतो यानंतर प्रशासकीय स्तरावर संमती घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम अहवाल सादर केल्यानंतर टप्प्या टप्प्याने फाईल पुढे जाते मात्र या सर्व प्रकियेत संबधित अधिकार्यांना पैसे दिल्याशिवाय खरा लाभार्थी शेतकरी अनुदास पात्र ठरत नाही. परंतु याच अधिकार्यांची मर्जी सांभाळून त्यांच्या मागणीनुसार पैसे दिले तर हेच अधिकारी खोट्या शेतकर्यांही अनुदान मिळवून देत असल्याचे उघड झाले आहे. याच योजनेत तालुक्यातील अनेक गावात कित्येक शेतकर्यांनी अधिकार्यांना अर्धे पैसे देऊन एकाच शेड वर कुटुंबातील दोन दोन व्यक्तीच्या नावे अनुदान लाटल्याचे उघड दिसुन येत आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सामान्य शेतकर्यांनी शासनाच्या नियमात बसून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अनुदान जमा करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकार्यांकडून उघडपणे शेतकर्यांकडून पैशाची मागणी करण्यात येत असून अधिकार्यांना टक्केवारी देऊन बोगस अनुदान लटणार्यांची संख्या अधिक आसल्याने या योजनेचा फायदा फक्त आणि फक्त संबधित कर्मचारी,अधिकारी व यांच्या मर्जीतील धनदांडग्या शेतकर्यांनाच होताना दिसून येत आहे. याबाबत अनेक तक्रारी असूनही कृषी विभागाच्या वरिष्ठांकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने त्यांचाही यात सहभाग असल्याचे यावरून दिसून येत आहे.
रोपवाटिका न करताच अनुदान लाटले अन अर्धे पैसे अधिकार्यांना वाटले
कृषी विभागाचा एक एक भ्रष्ट कारभार उघड येत असताना मात्र आता तर अधिकार्यांनी हद्दच केली. अनेक गावांत कित्येक शेतकर्यांच्या नावे याच पोखरा योजनेतून खोटे फोटो दाखवून कागदोपत्री हयात नसलेली रोपवाटिका असल्याचे दाखवून अनेक शेतकर्यांनी अनुदान लाटले व यातील अर्धे पैसे अधिकार्यांना वाटले असा प्रकारही आता समोर आला असून आता याबाबत ही चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.
एका शेडवर दोन वेळेस अनुदान
अधिकार्यांना पैसे दिल्यावर काहीही करू करू शकतात याचे प्रत्याक्षीत म्हणजे गेवराई तालुक्यातील अनेक गावातील अनेक शेतकर्यांच्या नावे असलेल्या एकाच शेड वर कुटुंबातील दोन दोन व्यक्तीच्या नावे पोखरा अनुदान लाटले हे तर आहेच परंतु भ्रष्ट अधिकार्यांच्या आशिर्वादाने अनेक गावात एकाच शेड वर नरेगा आणि पोखरा या दोन योजनांमधूनही अनुदान लाटल्याचे अनेक पुरावे आहेत.
कृषी विभागाचा एकही
अधिकारी फोन घेत नाही
या पोखरा योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी रिपोर्टरने तालुका कृषी अधिकारी, माजलगाव उप विभागीय कृषी अधिकारी यांना वेळोवेळी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र एकाही अधिकार्याने फोन उचलला नसल्याने त्या भ्रष्टाचारात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत आहे.