Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeदेश विदेश‘भारत बंद’ला पाठिंबा; शेतकर्‍यांबरोबर कॉंग्रेसही उतरणार रस्त्यावर

‘भारत बंद’ला पाठिंबा; शेतकर्‍यांबरोबर कॉंग्रेसही उतरणार रस्त्यावर


नवी दिल्ली (वृत्तसेवा)- कॉंग्रेसने अधिकृतरित्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून येत्या ८ डिसेंबर रोजी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली.
खेडा म्हणाले, आठ तारखेला होणार्‍या भारत बंदला कॉंग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करु.
गेल्या १० दिवसांपासून दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारशी सातत्याने अपयशी होणार्‍या चर्चा आणि कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धरणे आंदोलनाला बसले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!