पत्रकारांसमोरच घडला प्रकार
फोन लावूनही पंचायत समितीतील कर्मचारी येईनात
निष्क्रिय गटविकास अधिकारी पुन्हा तालुक्याला मिळाले
किल्ले धारूर (रिपोर्टर ) धारूर पंचायत समितीचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे येथील कर्मचारी येतात आणि दहा मिनिटातच जातात किंवा बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन बसतात याची प्रचिती पुन्हा आली.कर्मचारी आले आणि दहा मिनिटातच भूर्… झाले असा प्रकार तालुक्यातील पत्रकार समोरच दिसून आला.गटविकास अधिकार्यांचे कोणतेही कर्मचारी ऐकत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकार्यांनी त्या पंचायत समितीकडे लक्ष द्यायला हवे.
गोपाळपूर अंतर्गत येणार्या संभाजीनगर , वडारवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आहे. या भागात टँकरच्या खेपा वाढवाव्यात तसेच ज्या ठिकाणी गर्दी आहे तिथे पुढील पॉईंट द्यावा या मागणीसाठी पत्रकार नाथा ढगे, विशाल सराफ पंचायत समितीमध्ये गेले होते पंचायत समितीत गेले असता गटविकास अधिकार्यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्याला बोलावले परंतु कर्मचारी काही खुर्चीवरती नव्हते त्यांना फोन लावला असता फोनही त्यांनी रिसीव केला नाही कर्मचारी तर आले होते परंतु गेले कुठे हे गटविकास अधिकार्यांनाही माहीत नव्हते यामुळे आता पंचायत समितीत येणार्या कर्मचार्यांचे पितळ उघडे झाले आहे. यायचे आणि दहा मिनिटातच भूर … व्हायचे असा प्रकार सरास धारूर पंचायत समितीमध्ये दिसून येत आहे यामुळे सर्वसामान्यांचे कामे खोळंबत असून अशा बेशिस्त कर्मचार्यांवर कारवाईची मागणी होत आहे . काही काही कर्मचारी तर आल्याबरोबर सही करतात आणि पुन्हा दिवसभर कार्यालयात येतच नाही अशाही तक्रारी आता प्राप्त होत आहेत . गटविकास अधिकार्यांनी कर्मचार्यांवर वचक ठेवायला हवा
निष्क्रिय गटविकास अधिकारी –
धारूर तालुक्याला पुन्हा एकदा निष्क्रिय गटविकास अधिकारी मिळाल्याचे बोलले जात आहे धारूर तालुका हा गरीब ऊसतोड मजुरांचा तालुका समजला जातो या भागातील ग्रामीण जनतेच्या मोठ्या समस्या आहेत परंतु या सोडवण्यामध्ये गटविकास अधिकारी अपयशी ठरत आहे त्यामुळे पुन्हा एकदा जनता बोलत आहे की निष्क्रिय गटविकास अधिकारी तालुक्याला मिळाले आहे.