राजकीय भीष्माच्या घरात जन्म घेणे म्हणजे सुसंस्कृत होणे नव्हे
राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचा उजवा आणि डावा हात म्हणून ज्यांच्याकडे पाहितलं जातं ते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर सध्या जाणीवपूर्वक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांच्याकडून टिका होत असून रोहित पवार थेट वाल्मिक कराडांना खलनायक, गुंड असं म्हणून बोलतात तेव्हा याच रोहित पवारांना वर्षभरापूर्वीची आठवण येत नाही का? असा सवाल विचारला जात आहे. जेव्हा एकसंघ राष्ट्रवादी होती तेव्हा राष्ट्रवादी आणि ना.मुंडेंनी आयोजित केलेल्या राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रमाचे नियोजन पाहून थोरले, धाकले आणि शेंडफळ असलेले रोहित पवारही वाल्मिक अण्णाचे कौतूक करताना थकत नव्हते. त्याच रोहित पवारांना वर्षभरात अशी कुठली लागण झाली की एकनिष्ठतेचे टोक, कर्तव्य अन् मित्रत्वाची परिसिमा म्हणून ज्या वाल्मिक कराडांकडे पवार घराणे पहात होते त्यातील रोहित पवारांना वाल्मिक अण्णातला आज गुंड दिसला. यातून रोहित पवारांची नौटंकी स्पष्ट होतेय. जे की, शरद पवारांसारख्या घराण्याला आणि त्या घराण्याच्या सुसंस्कृतपणाला हरताळ फासणारी.
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय दृष्टय संवेदनशिल असलेला बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बहुचर्चित राहतो. मुंडे नावाचं राजकीय वलय राहिलेलेल्या बीड जिल्ह्याने सातत्याने महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राला आपल्याकडे खेचून आणले. सत्ता कोणाचीही असो… चर्चा मात्र बीड अन् मुंडे यांचीच होत राहते ती केवळ मुंडेंच्या पाठीशी उभे असलेले एकनिष्ठ, निस्वार्थी कार्यकर्ते…. गेल्या कित्येक वर्षापासून राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर मुंडेंच्या यशासाठी जिवाचे रान करणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत आहे.जिथे मुंडेंची उपस्थिती नाही, तिथे वाल्मिक कराडांचे नियोजन आणि कर्तृत्व जनसेवेत उभे ठाकलेले असते. मग, कार्यक्रम कुठलाही असो तो राजकीय आहे का? तो सामाजिक आहे का? खेळाचा आहे का? तो सांस्कृतिक आहे की आध्यात्मिक जिथे वाल्मिक कराड उभे तिथे तो कार्यक्रम यशस्वी असे गणित गेल्या साडे तीन ते चार दशकापासून जिल्हा आणि उभे राज्य पाहात आले आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मैत्रीचे गुणगान जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातले विविध पक्षांचे नेतेही करताना दिसून आले आहेत. गेल्या दहा बारा वर्षाच्या कालखंडात ना.मुंडेंनी शरद पवारांसोबत काम केले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन हे वाल्मिक कराडच करायचे. तेव्हा त्यांचे नियोजन, आयोजक, एकनिष्ठता, कतृत्व कर्म आणि मित्रत्वाचा धर्म पाळणारा सुदामा म्हणून हेच पवार कुटुंब अथवा राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराडांचे कौतूक करायचे. आज मात्र राष्ट्रवादी फुटली, काका शरद पवारांपासून पुतण्या अजीत पवार बाजुला झाले. त्यांच्या सोबत एकनिष्ठता आणि मैत्री बाळगत ना.मुंडेही शरद पवारांपासून वेगळे राहिले आणि इथेच थोरल्या पवारांच्या काल परवाच्या बोलबच्चनांना भाव आला. ते मुंडेंपासून आता थेट वाल्मिक कराडांपर्यंत आरोप करू लागले. खरं तर रोहित पवारांनी पवारांच्या घराचे संस्कार आणि संस्कृती आधी अंगीकारायला हवी. जे शरद पवार कतृत्व कर्म करणार्या राजकीय वैर्याचेही कौतूक करतात. त्याच शरद पवारांचे नातू माकडाच्या हाती कोलीत दिल्यागत आमदारकी आहे म्हणून थेट विधानसभेत वाल्मिक कराडांना खलनायक गुंड म्हणून हिनवतात. तेव्हा रोहित पवारांच्या वैचारिक उंचीची किव आल्याशिवाय राहत नाही. रोहित पवारांनी वर्षभरापूर्वीची घटना आठवावी, जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती, तेव्हा बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठमोठे कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमाचे नियोजन वाल्मिक कराडांकडे होते. त्यावेळी वाल्मिक कराडांचे ते नियोजन पाहून भारावून गेलेले अखंड राष्ट्रवादीचे व्यासपिठ कराडांवर कौतूकाची थाप मारत होते. तेव्हा थेट जयंत पाटलांनी धनंजय हा माणूस आम्हाला द्या म्हणत कराडांचं कौतूक केलं होतं. त्याच कराडांना त्यांनी खलनायक, गुंड म्हणत आपली अक्कल पाजळता. यातून राजकारणातल्या भिष्म घराण्यात जन्म घेवून राजकारण करता येत नसतं. त्यासाठी कतृत्व कर्म आणि वैचारिक धर्म पाळावा लागत असतो.