गावात अनेकजण आकडे टाकून चोरतात वीज
कुक्कडगाव (रिपोर्टर): कुक्कडगावसह परिसरात वीजेचा गेल्या काही दिवसांपासून लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरीक मिटर न वापरता चोरून वीज घेत आहेत. काही ठरावीकच मिटर आहेत. विजेचा लपंडाव थांबविण्याची मागणी नागरीकातून केली जात आहे.
वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे कुक्कडगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. विद्यूत पुरवठा सुरळीत करण्याकडे कंपनी दुर्लक्ष करत आहे. अनेकदा आकडे टाकून वीजेची चोरी करत असतांनाही त्या वीज चोराविरोधात वरिष्ठ अधिकार्यासह लाईनमन कुठलीही कारवाई करत नाहीत. वीजेचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने कगरण्यात येत आहे.