बीडमध्ये पहाटे
लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त
बीड (रिपोर्टर) इर्टिका गाडी क्र. एम,एच. 24 ए.एस. 3482 या गाडीमध्ये परशुराम मोहन गायकवाड हा व्यक्ती अवैधरित्या गुटखा आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला झाल्यानंतर पहाटे साडेतीन च्या सुमारास कुर्ला रोडवर सापळा रचला असता सदरील गाडी पोलिसांच्या सापळ्यात अडकली. ही गाडी गोविंद नवनाथ खांडे (वय 26 वर्षे, रा. पिंपळगाव मंजरा) हा चालवत होता. गाडीची पाहणी केली असता हिरा नावाचा गुटखा, गोवा गुटख्याचे मिक्स, गुटखा विक्री केलेले नगदी सहा लाख रुपये, मोबाईल, असे साहित्य मिळून आले. नगदी रोकडसह दहा ते बारा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कुर्ला रोडवरील तिरूमला आईल मिलच्या समोर परशुराम मोहन गायकवाड हा इर्टिगा गाडी क्र. एम.एच.23 एएस 3482 मध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी घेवून येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी दोन वेगवेगळे पथके लावून सापळा रचला. पहाटे 3.30 च्या सुमारास इर्टिगा गाडी आलेली दिसली. पोलिसांनी ती थांबवून चालक गोविंद नवनाथ खाडे वय26, रा.पिंपळगाव मंजरा ता.बीड व त्याच्या इतर साथीदार गाडीत असताना गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये हिरा नावाचा गुटखा असलेल्या 19 गोण्या व गुटख्यात मिक्स करण्याच्या 19 गोण्या असा 5 लाख 74 हजार 750 रूपयाचा गुटखा व गाडीच्या डिक्कीमध्ये गुटखा विक्री केलेली नगदी 6 लाख रूपये इर्टिगा गाडी व दोन मोबाईल असा एकूण 16 लाख 85 हजार 750 रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात कलम 328, 272, 273, 188, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, पीएसआय भगतसिंग दुल्लत, पो.हे.कॉ.मनोज वाघ, नशीर शेख, रामदास तांदळे, मोहन क्षीरसागर, पोलिस नाईक विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, अशोक दुबाले, गणेश हंगे, चालक अशोक कदम आणि अतुल हराळे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.