पुणे: राज्यातील भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आई आजारी असल्याचं करण देत भाजपच्या चार आमदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. मुकेश राठोड असं या तरुणाचं नाव आहे. तो मराठवाड्याचा असल्याची माहिती आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोडने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणून काही रक्कम ऑनलाइन माध्यमातून मुकेश राठोडला पाठवली. मात्र, नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आमदारांनी त्याच्याविरोधात बिबेवाडीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून मुकेश राठोड अजूनही फरार आहे त्याच्या शोध पोलीस घेत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डेकर, देवयानी फरांदे या चार भाजपच्या आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्यातल्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलिसांना पत्र लिहून कळवलं होतं.