खासगी रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयात ठेवले दलाल, जिल्हा रुग्णालयाची बदनामी करत रुग्ण केले जाते रेफर
गणेश जाधव । बीड
सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. येथे गंभीर अतिगंभिर रुग्ण दाखल होतात. मात्र काही खासगी रुग्णालयाने येथे दलाल नेमले आहे. ते जिल्हारुग्णालयात आलेल्या गंभीर अतिगंभिर रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हारुग्णालयात वेळेवर डॉक्टर येत नाहीत. ते रुग्णांकडे दुर्लक्ष करतात. पैशाकडे पाहून नका, रुग्णांचा जिव महत्वाचा आहे असे म्हणून सरळ सरळ खासगीचा पत्ता देतात. स्वत: रुग्णासोबत जावून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करुन आपली दलाली घेतात.
ही गंभर बाब असून याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी लक्ष देवून अशा दलालांवर कारवाई करणे गरजेचे आहे. महागाईचा भस्मासुरु सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसला आहे. दैनदिन खर्च करतांना या वर्गाला मोठी कसरत करावी लागते. अशातच काही अपघाताने संकट आले तर कर्ज काढावे लागते. सर्वसामान्यांना जिल्हारुग्णालयात उपचार घेणे परवडणारे आहे. जिल्हा रुग्णालयात तशा दर्जेदार सुविधाही मिळत आहे. येथे दर्जेदार सुविधा मिळत असल्याने शहरात काही टोलेजंग इमारती बांधलेल्या खासगी रुग्णालयात रुग्ण फिरकत नाहीत. अशा खासगी रुग्णालयांनी 20 ते 30 टक्के दलालीवर आपले दलाला जिल्हारुग्णालयात नेमले आहेत. हे दलाल जिल्हा रुग्णालयात एखादा अपघातातील रुग्ण, औषध घेतलेला, जळालेला, सर्पदंश झालेला असो की अन्य काही गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आले की यातील काही दलाल जसे की रुग्णांचा कोणी जवळचा नातेवाईक आहे असी घाई करत अरे डॉक्टरला बोलवा, हे करा ते करा म्हणत घाई गरबड करतात, अन् नातेवाईकांना मी तुमच्या गावाच्या शेजारचा आहे. आमुक आमुक माझ नाव आहे. येथे डॉक्टर वेळेवर केव्हाच उपलब्ध नसतात. रुग्ण गंभीर आहे. येथे कोणी लक्ष देत नाहीत. तुम्ही पैशाकडे पाहून नका, तत्काळ …..या खासगी दवाखाण्यात रुग्ण हलवा असे म्हणून नातेवाईकांना घाबरुन दिले जाते. सोबत आलेले नातेवाईकही रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांना पैशाकडे नको पाहू म्हणत चला खाजगी दवाखाण्यात नेवू म्हणून सांगतात अन् रुग्ण येथून रेफर केला जातो. हे दलाला रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनेशी खेळून आपली दलाली घेताता.
जिल्हा रुग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयाची बदनामी करुन जर कोणी रुग्णाला रेफर करण्यास भाग पाडत असले तर अशा लोकांवर योग्य ती कारवाई करु. हा गंभीर प्रकार आहे.
डॉ. सुरेश साबळे
जिल्हाशल्यचिकित्सक, बीडअशी केली जाते दलाली
जिल्हा रुग्णालयात एखादे रुग्ण दाखल होताच. दलाल रुग्णांजवळ येतो. जसा की तो त्याचा रक्ताचा नातेवाईक आहे. येवढी घाई जिल्हारुग्णालयात रुग्णाला तत्काळ उपचार मिळावा म्हणून करतो. आरडा ओरडा करुन मला तुमच्या रुग्णांची खूप काळजी आहे असे नातेवाईकांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अन् जिल्हा रुग्णालयात वेळेवर लक्ष देत नाहीत. रुग्ण गंभीर आहे. चार पैसे जातील मात्र रुग्ण ठणठणीत होईल असे म्हणून सरळ सरळ खाजगी दवाखाण्यात हलवण्याचा सल्ला दिला जातो. तो दलाला ऐवढी घाई करतात की त्या वेळी नातेवाईकांना काहीही एक कळायच्या आत तो रुग्ण बाहेर काढून खासगीची वाट धरतो. अन् आपली दलाली फिक्स करतो.