Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडजरुड फाट्यावर शिवसंग्रामचा रास्ता रोको

जरुड फाट्यावर शिवसंग्रामचा रास्ता रोको


बीड (रिपोर्टर)- बिबट्याच्या भितीपोटी शेतकरी रात्री शेतामध्ये जात नसल्याने शेतकर्‍यांना दिवसा उच्च दाबाने विद्युत पुरवठा करावा, या मागणीसाठी आज जरुड फाटा येथे शिवसंग्रामच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यत आले. या आंदोलनात अनेकांची उपस्थिती होती.


सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. मध्यंतरी आष्टी तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकर्‍यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

आजही शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जात नाहीत. वीज कंपनीने दिवसा उच्च दाबाने विजेचा पुरवठा करावा जेणेकरून शेतकर्‍यांना दिवसभर पिकांना पाणी देता येईल. डी.पी. खराब झाल्यावर दोन दिवसात दुरुस्त करण्यात यावी, रुई लिंबा, लिंबा रुई हे गाव राजूरी नवगण सबस्टेशनला जोडण्यात यावे, ग्रामीण भागात सिंगलफेज डी.पी. उपलब्ध करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी बीड-परळी हायवेवरील जरुड फाटा येथे शिवसंग्रामच्या वतीने आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!