Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडकोविडमध्ये ड्युटी करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

कोविडमध्ये ड्युटी करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
कर्मचार्‍यांचे आंदोलन

बीड (रिपोर्टर)- कोविड वॉर्डात काम करण्यासाठी अनेक कर्मचार्‍यांची कंत्राटी बेसिसवर भरती करण्यात आली होती, आता या कंत्राटबेसवरच्या कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले. या कर्मचार्‍यांनी सेवेमध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात ५० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
देशभरामध्ये कोविडचा प्रसार वाढत असल्याने शासकीय रुग्णालयामध्ये काम करण्यासाठी कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत होता. कंत्राटी बेसवर अनेक कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना काढण्यात आले. या कर्मचार्‍यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे किंवा आरोग्य विभागाच्या जागा निघाल्यानंतर या कर्मचार्‍यांसाठी ५० टक्के राखीव कोटा ठेवावा या मागण्या घेऊन कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!