बीड (रिपोर्टर): बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेते, पदाधिकार्यांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विचाराने प्रेरित होवून अनेकांनी पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दरदिवशी प्रवेश सोहळे होत आहेत. पक्षात येणार्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
बीड तालुक्यातील तळेगाव येथील माजी उपसरपंच गणेश घोलप, माजी ग्रा.पं.सदस्य गंगाराम महाकुडे, ग्रा.पं.सदस्य सिद्धार्थ महाकुडे, अशोक घोलप, रितेश सौदा, मंगेश वाघमारे, आकाश महाकुडे आदींनी प्रवेश केला. हिवरापहाडी, अंजनवती येथील रमेश जाधव, भिमराव पालवे, अशोक पालावे, बंडू गोरे, अंनत शिंदे, राहुल आनेराव, गोकुळ शिंदे, आंधारीनाथ काबळे, समीर पालवे, नारायण देवकते आदींनी प्रवेश केला. अंजनवती येथील अशोक शिंदे, अनिल शिंदे, अविनाश शिंदे, राम शिंदे, दत्ता शिंदे, राहुल शिंदे, बप्पा शिंदे, बन्सी शिंदे, रामहरी येडे, कृष्णा शिंदे, मेघराज येडे, संतोष शिंदे, सुरेश टाकळे आदींनी प्रवेश केला. रायमोहा येथील माजी सरपंच शेख हाशम यांच्यासह सोहेल शेख, प्रदीप जाधव, बाळासाहेब मिसाळ, उद्धव विघ्ने, टाकळवाडीचे उपसरपंच रामहरी कदम, माजी उपसरपंच सुदाम नागरे, काळू नागरे, भाऊसाहेब जायभाय, लाला पठाण, चेअरमन रशीद पठाण, महेश चव्हाण, लहू गायकवाड, बाबू समगे, शमशेर पठाण, मोहसीन पठाण, राम पालवे, बाळू गणपत, राजू सानप, श्रीकांत विघ्ने, लियाखत शेख, योगेश तांबारे, जालिंदर नेमाने, भरत कोकाटे, गणेश कंठाळे, अजिंक्य जाधव, मुन्ना पठाण, गणेश सानप, साहिल शेख, कैलास पवार, अविनाश काळे, प्रेम काळे, भगवान चव्हाण, युवराज चव्हाण, प्रल्हाद चांदणे, अक्षय सानप, रोहन पवन चांदणे, कैलास पवार, ओम चांदणे आदींनी प्रवेश केला.
चौकट
बीड शहरातून दरदिवशी होतायेत प्रवेश
बीड शहरातून दरदिवशी प्रवेश होत असून तेरवी लाईन, अजिजपुरा भागातील युवा नेते केशव रत्नपारखे यांच्यासह अनेक तरुण, महिलांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, नाळवंडीचे सरपंच ड.राजेंद्र राऊत, नगरसेवक रवींद्र कदम, संदीप डावकर, शुभम कातांगळे, शैलेश गिरी, नंदन पवार, विशाल मोरे, विक्रम चव्हाण, अनिल देवतरासे आदी उपस्थित होते.
चौकट
नीळकंठेश्वर महादेव मंदिरात डॉक्टर दाम्पत्याकडून आरती
बीड शहरातील नीळकंठेश्वर महादेव मंदिरात डॉ.योगेश व डॉ.सारिकाताई यांनी मनोभावे आरती केली व दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक नामदेवराव दुधाळ, पानखडे, गोरे, घोडके महाराज, विद्याभुषण बेदरकर, गोरख यादव, राजेंद्र गोरे, रामचंद्र ढोले, कैलास पांचाळ, प्रकाश मोरे, भाग्यश्री पांचाळ, माजेद कुरेशी आदी उपस्थित होते.