मुंबई (रिपोर्टर): मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रुग्ण आणि रुग्णालयांनाही दिलासा दिला आहे,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख पर्यंत वाढवण्यात आले आहेत. दर्जेदार आरोग्य सेवा गोरगरिबांपर्यंत ही पोहोचावी आणि त्यांना विम्याचे संरक्षणही मिळावे या हेतूने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेलाही चांगले दर्जेदार उपचार घेता येत आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत होणार्या उपचारांचे दरपत्रक जैसे थे असल्याने योजना अंगीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांवर मोफत उपचार करताना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे उपचारांच्या दरपत्रकांविषयी फेरविचार व्हावा अशी मागणी होत होती, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक समिती नेमून अभ्यासपूर्वक आणि सर्वसामान्य नागरिकांना आणि रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला.
रुग्ण आणि रुग्णालयांमध्ये समन्वय साधण्यासाठी या योजनेतून दोघांनाही लाभ मिळायला हवा हा हेतू ठेवूनजनरल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत होणार्या उपचारांच्या दरातील तफावत दूर केली. या योजनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचाही समावेशही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला असून याद्वारे 1653 उपचार पद्धती मिळत आहेत. या योजनेचे विस्तारीकरण करताना यात नवीं रुग्णांच्या देखील समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत होणार्या शस्त्रक्रियांचे दर पुरेसे नसल्याने रुग्णालयांना वाढत्या महागाईचा फटका बसत होता पण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दरातील ही तफावत दूर करण्याचा निर्णय घेतला परिणामी बायपास शस्त्रक्रिया जुने दर एक लाख रुपये होते ते आता दर 1 लाख 25 हजार करण्यात आले आहेत, हृदयाचा झडपा बदलण्याचा जुना दर 1 लाख 20 हजार रुपये होता तो आता 1 लाख 45 हजार रुपये करण्यात आला आहे तर किडनी स्टोन काढण्याचा जुना दर 30 हजार रुपये होता तो आता नवीन दर 40 हजार रुपये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या या निर्णयामुळे हजारो रुग्णांना लाभ घेता आला आहे.