21 कलमी विकासाचा कार्यक्रम आ. सोळंके यांचेकडुन जाहिर
माजलगावात पत्रकार परिषद
माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणा-या 21 कलमी विकासाचा वादा आ. प्रकाशदादांनी जाहिर करत राष्ट्वादी काँग्रेसचा माजलगाव मतदारसंघाला विकासाचा वादा असल्याचे आ. प्रकाश सोळंके यांनी सांगीतले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या निवासस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. सोळंके म्हणाले की, पुढील पाच वर्षात माजलगावला प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबकेडकर या महापुरूषांचे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली, ग्रामीण भागातील स्वच्छ पाणी पुरवठा प्रतिव्यक्ती 55 लिटर करून प्रत्येक गाव, वस्ती, तांडा बारमाही रस्त्याने जोडण्याचा वादा, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारून शेतक-यांना हमखास उत्पन्न मिळवुन देण्याचा तसेच शेतीपोच रस्त्यासाठी पाणंद रस्ते योजना प्रत्येक गावात राबविण्याचा वादा, माजलगाव येथे विकास प्रतिष्ठाणचे रत्नसुंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सहा महिण्यात सुरू करण्याचा वादा, पोखरा योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सर्व योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करण्याचा वादा यासह मतदार संघात विवीध विकासकामांचा वादा आ. सोळंके यांनी यावेळी केला तर शहरात असलेल्या अनेक प्रलंबीत प्रश्नाबाबत पत्रकारांनी विचारले असता पुढील चार महिण्यांत बाजाराच्या जागेचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगीतले. धारूरच्या अरूंद रस्ता घाटाचा, माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्यावरील नाल्यांचा प्रश्न लवकर सोडविण्यात येईल तर अपक्ष उमेदवारांकडुन महायुतीचे नेते आ. पंकजा मुंडे व ना. धनंजय मुंडे यांच्या फोटोंचा वापर करून जनतेची दिशाभुल केली जात आहे. याच्याविरोधात पक्षश्रेंष्ठींकडे तक्रार केली असुन त्यावर कारवाई होईल असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, माजलगाव विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाश सोळंके, मा. सभापती जयसिंग सोळंके, अच्युतलराव लाटे, सभापती जयदत्त नरवडे, मा. सभापती संभाजी शेजुळ, चंद्रकांत शेजुळ यांची उपस्थिती होती.
– चौकट –
मी दहशतवादी किंवा गुंड असतो तर माधव निर्मळ सारखा कार्यकर्ता माझ्यासोबत राजकीय, सामाजिक दृष्ट्या अनेक वर्षे राहिला नसता. मी राजकारण करतांना व समाजकारण करतांना गुंडगीरी अथवा दहशतवादाचा वापर कधीच केला नाही व सोळंके कुटूंबीय करणार ही नाहीत. आम्ही केवळ विकास कामांवर मते मागतो. कै. सुंदरराव सोळंके यांच्या पुण्याईपासुन ते आपर्यंत आम्ही फक्त विकासकामेच केली. दहशतवाद किंवा गुंडगीरी नाही असे त्यांनी पत्रकाराला उत्तर देतांना सांगीतले.