मुंबई (रिपोर्टर): शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे यांनी आज सकाळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली. या वेळी ज्योती मेटे यांनी राज्यात भाजपासह महायुतीला मिळालेल्या घवघवीत बहुमताबद्दल पुष्पच्छ देऊन अभिनंदन केले. गेल्या महिनाभरापूर्वीच ज्योती मेटे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये डेरेदाखल झाल्या होत्य. त्यांनी बीड विधानसभाही लढवली होती.
गेल्या महिनाभरापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेल्या शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे यांनी आज मुंबईतील सागर बंगल्यावर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मेटे या पवारांकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक होत्या, मात्र त्यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. निकालानंतर आठ दिवसानी ज्योती मेटे या फडणविसांच्या सागर बंगल्यावर आज डेरेदाखल झाल्या. राज्यात महायुतीसह भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले. त्याबद्दल देवेंद्र फडणविसांचे अभिनंदन करण्यासाठी मेटे फडणविसांच्या सागर बंगल्यावर गेल्याचे सांगण्यात येते. दिवंगत विनायकराव मेटे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सलोख्याचे संबंध होते मात्र मध्यंतरी निवडणुकीच्या दरम्यान फडणविसांची भेट घेऊन ज्योती मेटे या शरद पवारांकडे गेल्या होत्या. त्या घडामोडीनंतर ज्योती मेटे यांनी प्रथमच फडणविसांची भेट घेतली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केले. काही काळ दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या चर्चेतील तपशील मात्र समजू शकला नाही.