आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले
बीड, (रिपोर्टर)ः- केशवराज अर्बन बँकेला दिलेला चेक वटला नसल्याने या बाबत न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून तीन महिने शिक्षा व दिड लाख रूपये दंड ठोठावला.
आरोपी सचिन मारोती भोले यांने केशवराज अर्बन निधी प्रा.लि. बीड यांच्याकडून व्यवसायाकरीता 50 हजार रूपये कर्ज घेतले हेाते. सदर कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज खाते थकीत गेले. आरोपीने फिर्यादी केशवराज निधीच्या नावे 85 हजार 125 रूपयांचा शाहु बँकेचा धनादेश दिला. सदर धनादेश न वटल्यामुळे फिर्यादी केशवराज निधी बँकेने प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपी विरूध्द एनसीसी नं.140/202 कलम 138 (एनआय अॅक्ट) प्रमाणे अॅड.विवेक डोके यांनी फिर्याद दाखल केली असता फिर्यादी पक्षाचे पुरावे ग्राह्य ध रून आरोपीस तीन महिन्यांचे कैद व दिड लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादी तर्फे अॅड.विवेक डोके यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.राजेश जाधव, अॅड.सतिष गाडे, अॅड.रूचके यांनी सहकार्य केले.