आरोपी विरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- अंबाजोगाई शहरातील एका मद्यपीने जेसीबीवर दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांच्यासोबतही हुज्जत घातली. या प्रकरणी मद्यपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शहरातील गुरूवार पेठ येथे घडली.
अक्षय परदेशी याने अंबाजोगाई शहरातील एका जेसीबीवर दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांसोबतही त्यांने हुज्जत घातली. या प्रकरणी परेदीश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.