बीड (रिपोर्टर): बीड पंचायत समितीतील बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात हजर राहत नसतात. बीडीओ ऑफीसमध्ये आल्यानंतरही कर्मचारी हजर नसल्याने बीडीओंनी 19 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये इंजिनिअरसह इतर कर्मचार्यांचा सहभाग आहे.
नगर रोडवर बीड पंचायत समितची इमारत आहे. या कार्यालयात तालुक्याचे कामकाज चालते. घरकुल, रोहयो, फळबाग, रस्ते यासह इतर कामे पंचायत समितीमार्फत होत असल्याने दररोज अनेक नागरीक विविध कामांसाठी कार्यालयात येत असतात मात्र कार्यालयामध्ये अधिकार्यांसह कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत. खुर्चीवर बसत नाहीत. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना अधिकार्याचीं वाट पहात कार्यालयात थांबावे लागते. बीडीओ नियमित कार्यालयात येतात मात्र कर्मचारी हजर राहत नसल्याने बीडीओंनी 19 कर्मचार्यांना कारणेदाखवा नोटीस बजावल्या आहेत.