बीड, (रिपोर्टर) ः जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावात कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र तरीही गावकर्यांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे जलजीवन अंतर्गत 1 कोटी 50 लाख रूपयांचे काम होत आहे. सदरील काम पूर्ण होत नसल्याने गावकर्यांचे पाण्यासाठी हाल होऊ लागले. आज संतप्त महिलांनी पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला. या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
प्रत्येक नागरिकांना शुध्द पाणी मिळावे यादृष्टीकोणातून जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक गावात कोट्यावधी रुपयांची अनेक कामे सुरू करण्यात आली. काही गावातील कामे पूर्ण झाली तर काही गावातील कामे अपूर्ण राहीली. जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कामे पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे 1 कोटी 50 लाख रूपयाची योजना मंजूर करण्यात आली. मात्र, या योजनेअंतर्गत संपूर्ण काम झाले नाही. काम पूर्ण झाले नसल्याने गावकर्यांचे पाण्यासाठी हाल होऊ लागले. वेळोवेळी तक्रारी देऊनही जिल्हा परिषद दखल घेत नसल्याने आज संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.