घटना घडली 24 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला 15 मार्चला
परळी, (रिपोर्टर)ः- शहरातील तहसील कार्यालय व मोंढा येथून वाहनांच्या डिक्कीत ठेवलेले दोन जणांचे एकूण 2 लाख 40 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी भर दिवसा घडली. याप्रकरणी 15 मार्च रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बँकेतून पैसे काढताना त्यावर नजर ठेवून डल्ला मारणारे चोरटे हे बाहेरगावच्या चोरट्यांच्या गँगमधील असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील शेतकरी बाबुराव दहिफळे यांनी काही कामानिमित्त एका बँकेतून 2 लाख रुपये 24 फेब्रुवारी रोजी काढले होते. काढलेले दोन लाख रुपये पिशवीमध्ये ठेवून चार चाकी वाहनाच्या डिक्कीत ठेवले होते. बाबुराव दहिफळे तहसील कार्यालयात काही कामानिमित्त गेले होते. त्यांच्या गाडीजवळ कोणी नव्हते हे पाहून अज्ञात चोरट्चाने त्यांच्या गाडीच्या काचा फोडून व दरवाजाचे लॉक तोडून पैसे घेऊन धुम ठोकली.
नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, रोख रक्कम, सोन्याचा ऐवज याविषयी सतर्कता बाळगावी. परळी शहरातील अनेक वॉर्डामध्ये चोरीचे प्रकार घडू नये यासाठी नागरिकांची रात्रीची गस्त सुरू केली आहे. शहरात घडलेल्या चोर्यांचा तपास चालू आहे.
, पोलिस निरीक्षक,रघुनाथ नाचन परळी शहर ठाणे.24 फेब्रुवारीची घटना, 15 मार्च रोजी दाखल झाला.गुन्हा तोडून आतील दोन लाख रुपये चोरून नेले.तसेच आठवड्यात सोमवारी बाजार भरतोय नागरिकाचे मोबाईल चोरी होताना नागरिक चच्रेत आहे.
याप्रकरणी बाबुराव दहिफळे यांनी परळीच्या शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्धाविरुद्ध 15 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्यंकटराव भताने हे करीत आहेत. तसेच धनराज मुंडे (रा.नाथरा) यांनी एका बँकेतून काढलेले 40 हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. डिक्कीमध्ये ठेवलेले 40 हजार रुपये चोरांनी मोंढा भागातून चोरून नेले.