माजलगाव (रिपोर्टर): लोकमत समुहाच्या वतीने हाँकाँगमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या ग्लोबल कन्व्हेक्शन कार्यक्रमामध्ये बहुजन विकास परिषदेचे सर्वेसर्वा बाबूराव पोटभरे यांचे चिरंजीव विश्वजीत बाबूराव पोटभरे यांचा सिनेक्षेत्रातल्या संगीताच्या दुनियेत यशस्वी काम केल्याबद्दल विश्वजीत याला लोकमत ग्लोबल एक्सलेशन इन इंडिया या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्रख्येत सिनेअभिनेता सोनु सूद यांच्या हस्ते देण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगावसारख्या छोट्या भागातून सिनेक्षेत्रात भरारी घेत विश्वजीतने जिल्ह्याची मान उंचावली आहे, विश्वजीत तुझे अभिनंदन, असे म्हटले आहे.
विश्वजीत बाबुराव पोटभरे हा माजलगावसारख्या ग्रामीण भागातून आलेला तरुण या तरुणाने भारतीय फिल्मी जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इ.स. 2017 मध्ये टी सिरीजने त्याचा पहिला अल्बम ‘दिल बुद्ध’ हा प्रसारीत केला. या अल्बमला चांगली प्रसिद्धी मिळाली. पुढे त्याने संगीतक्षेत्रात पाऊल ठेवून 2020 मध्ये एक गीत गायिलं, ते तब्बल 20 कोटी लोकांनी पाहिलं. पुढे विश्वजीत पोटभरे यास कॅटबरी चॉकलेटच्या एका अल्बममध्ये मुख्य कलाकाराची भूमिका मिळाली. न थांबता विश्वजीतने नंतर एबी प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. सिनेक्षेत्रातल्या त्याच्या या भरारीची दकल घेऊन लोकमत समुहाच्या वतीने हाँककाँगमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात विश्वजीत पोटभरे यास लोकमत ग्लोबल एक्सलेशन इन इंडिया या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याच्या या कामाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र तसेच माझे सहकारी मित्र बाबुराव पोटभरे यांचा चिरंजीव विश्वजीत याला सिनेक्षेत्रातल्या योगदानाबद्दल लोकमत ग्लोबल एक्सलेंस इन इंडिया सिनेमा या अवॉर्डने सुप्रसिद्ध अभिनेते सोनु सुद यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावसारख्या छोट्या भागातून सिनेक्षेत्रात भरारी घेत विश्वजीतने जिल्ह्याची मान उंचावली आहे, विश्वजीत तुझे अभिनंदन, असे म्हटले आहे.