ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माजलगाव (रिपोर्टर): तालुक्यातील लहामेवाडी येथे सोमेश्वर आश्रुबा कापसे यांच्या घराचे दिवसाढवळ्या कुलूप तोडून घरातील साडेदहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याची घटना ता. 17 सोमवारी घडली आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील लहामेवाडी येथील शेतकरी सोमेश्वर आश्रुबा कापसे व त्यांच्या घरातील सर्व लोक हे रोजच्या प्रमाणे घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन व पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील ठेवलेले नगदी चार लाख रुपये सोन्या, चांदीचे दागिने व नगदी साडेतीन लाख असा एकूण साडेदहा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला असून ग्रामीण पोलिसांनी स्वान पथक आणले होते. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमेश्वर आश्रोबा कापसे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एन. सोनवणे, एस. आर. बळवंते हे करत आहेत. दरम्यान घटनास्थळी श्वान पथक, दरोडा प्रतिबंधक पथक, ठसे तज्ञ पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भेट दिली आहे.