मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने आजचा दिवस वादळी ठरणार असे वाटत असतानाच दुसरीकडे विधानसभेच्या बाहेर एका झाडावर सकाळी तरुण चढला. त्याच्या हातात तिरंगा झेंडा, सेंद्रिय कॉलची संकल्पना असलेला बॅनर आणि घोषणाबाजी यामुळे एकच खळबळ उडाली. ज्या ठिकाणच्या झाडांवर तो चढला त्याठिकाणी बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे बराच वेळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली. सदरचा तरुण हा बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील ईश्वर शिंदे हा आहे. बीडच्या तरुणाने आज पुन्हा थेट मुंबईत विधान भवना बाहेर झाडावर चढून आंदोलन केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. अग्निशामक दलाला पाचारण करून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

हातामध्ये तिरंगा, सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर घेऊन सकाळच्या सुमारास बीडच्या ईश्वर शिंदे नावाचा तरुण विधान भवनाबाहेरच्या झाडावर चढला. हे निदर्शनास येताच पोलिसांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी शिडी लावून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने खाली उतरण्यास नकार दिला. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता.
तरुण झाडावर चढल्याने तिथे बघ्यांचीही गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणाने नकार दिला. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारीही शिडीवरून झाडावर चढले आणि त्यांनी त्याला खाली उतरण्याची गळ घातली. मात्र लिखित स्वरुपात पत्र आणले तरच खाली उतरेल असा पवित्रा तरुणाने घेतला. अखेर त्याची मनधरणी करण्यासाठी भाजप आमदार अनुप अग्रवाल क्रेनने झाडाजवळ गेले. त्यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारीही होते. यानंतर तोडगा निघाला आणि तरुण खाली उतरला. सदरचा तरुण हा बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील ईश्वर शिंदे असल्याचे समोर आले आहे.
संंपादित जमिनीचा पूर्ण मावेजा मिळाला नाही
शासन दखल घेत नाही
ईश्वर शिंदे हा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाशी लढा देत आहे. खापर पांगरी येथील सज्जतपुर तलावामध्ये त्याची देखिल जमिन संपादित झालेली आहे. मात्र या संपादित जमिनीचा पूर्ण मावेजा त्याला मिळालेला नाही. मावेजासाठी आणि ऑगेनिक माल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी त्यानी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाासमोर आंदोलन केले. विविध खात्यातील मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना निवेदन देवून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा सुध्दा केलेली आहे.