बीड (रिपोर्टर): वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता अनेक गावात पाणीटंचाई भेडसावू लागलीय. बीड तहसीलदार यांनी पाणीटंचाईकडे लक्ष देऊन गावकर्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाप्रमुख गिराम यांनी तहसीलदारांना दिले आहे.
शेतकरी फार्मर आयडीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, श्रावण बाळ योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांचे अंगठे उमटत नाही त्यावर दुसरी उपाययोजना आखावी, ग्रामीण भागातील पाणीटंचाईसाठी योग्य ती भूमिका घ्यावी व पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार हजारे यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, संजय महाद्वार, रतन गुजर, राजू महुवाले, सुशील पिंगळे, नवनाथ प्रभाळे, प्रदीप कोटुळे, बंटी परदेशी, दिलीप पवार, बाळू वैद्य यांच्यासह आदींची उपस्थिती होती.