लिंबागणेश:- ( दि.३०) तोडले मी बंधन, गाडल्या त्या रूढी, माझ्या शंभुराजांच्या नावाने उभारा भगवी पताका लावून गुढी अशा शुभेच्छांची देवाण घेवाण करत मागील काही वर्षांपासून परिवर्तनवादी गुढी उभारण्यास सुरुवात झाली आहे. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र असलेले भगवे ध्वज गावोगावी लावण्यात आले आहेत.
भगवी पताका हिच आमुची खरी गुढी आता नाही लटकविणार घरावर साडी; अशुभ आहे तो उलटा तांब्या,मयतालाच लागतात कडुनिंबाच्या फांद्या,तिरडीला बांधतो एरंडाची काठी,सोडा मायबापहो फक्त आपल्या शंभुराजासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. गुढीपाडव्याच्या पुर्व दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती.त्यामुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बहुतांश बहुजण कुटुंबियांनी पारंपरिक गुढी न उभारता आज दि.३० रविवार रोजी आपल्या घरांवर भगवी पताका उभारून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली.त्यामुळे हा दिवस अशुभ आहे.एवढेच नव्हे तर मंगलकार्यात कलश सरळच असतो पण नेमका गुढीपाडव्यालाच उलटा का टांगला जातो, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कडुनिंबाचा पाला घरी आणला जातो.एवढेच नव्हे तर बाबुंचा वापर हा तिरडीसाठी केला जातो.या सगळ्या बाबी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी संबंधित असुन अशुभ आहेत.त्यामुळे गुढीऐवजी घरावर भगवा ध्वज फडकावुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करावे असा मेसेज सोशल मिडीयातुन व्हायरल होत आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन दिसून येत आहे.