बीड, (रिपोर्टर)ः- नातेवाईकाकडेआलेल्या एका व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदरील व्यक्तीचा गळफास काढून त्याला बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. ही घटना आज सकाळी वासनवाडी फाटा येथे घडली.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अमोल जाधव हा व्यक्ती बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा येथे असलेल्या नातेवाईकाकडे आला होता. आज सकाळी त्याने एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . हा प्रकार तेथील लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी धाव घेवूनत्याचा फास काढत अॅम्ब्युलन्सला फोंन करण्यात आला. सदरील व्यक्तीस जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे मात्र समजू शकले नाही.