न.प. विविध विकास कामाचे सत्ताधारी व विरोधकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी नगरपंचायतीच्या तब्बल 46.85 कोटी रुपायाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजाण्याच्या सुमारास स्व.गोपीनाथ मुंडे चौक याठिकाणी आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते तर इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडला आहे. यावेळी बोलताना सोळंके म्हणाले कि, वडवणी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध प्रश्नासाठी तसेच प्रलंबित विकास कामाचा निपटरा करण्यासाठी येत्या 15 दिवसात एकाच दिवशी दोन जनता दरबार घेऊ असे अभिवचन आज वडवणी तालुक्याला दिले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, शहराचा विकासात्मक कायापलट व्हावा यासाठी शासनाच्या विविध विभागातून तब्बल 46.85 कोटी रु.निधी मजुंर झाला असून या कामाचा उद्घाटन शुभारंभ आज स्व.मुंडे चौक याठिकाणी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून माजलगांव विधानसभेचे भाग्यविधाते आ. तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवा नेते तथा जि.प. सभापती जयसिंगभैय्या सोळंके तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरध्यक्ष शेषेराव जगताप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बन्शी मुंडे,राजाभाऊ मुंडे, अस्लम कुरेशी, बजरंग साबळे,बाबरी मुंडे, सर्जेराव आळणे, औंदुबर सावंत, गंपू पवार, दिनकरराव आंधळे, विठ्ठल भुजबळ, महादेव ऊजगरे, युवराज गोंडे, बळीराम आजबे, संदिपान खळगे, आसाराम महाद्दर, अंकुश शिंदे, जयदत्त नरवडे,
प्रशांत सावंत,संभाजी शिंदे,नवनाथ म्हेत्रे,भारत जगताप,अँड.आनंद काळे,पोपट निगळ,विठ्ठल भुजबळ,महादेव अंबुरे,रंजित मस्के,अँड.सचिन लंगडे
नारायण डिगे,सय्यद सज्जाक यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रस्ताविक उपनगरध्यक्ष बन्शी मुंडे यांनी केले तर राजाभाऊ मुंडे व नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांची भाषणे झाली. यानंतर आ.प्रकाश सोळंके उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले कि, वडवणी शहराच्या विकासात राजकारण होऊ नये, विकास कामे व्हावीत म्हणून सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटाने समस्व भूमिका घेत आणि एकत्र येत विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.असं म्हणत शहरातील 46.85 कोटी रुपायाच्या विकास कामाचा उद्घाटन शुभारंभ झाला आहे. असे घोषित केले तर,पुढील 15 दिवसाच्या आत शहरासह तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी तसेच प्रलंबित विकास कामाच्या बाबत स्वतंत्र एकच दिवशी दोन जनता दरबार घेऊन प्रश्नाचा निपटरा करणार आहे. अस अभिवचन यावेळी आ.प्रकाश सोळंके यांनी वडवणीकरांना दिले आहे. तर या कार्यक्रमाचे आभार गटनेते अस्लम कुरेशी तर सुत्रसंचलन अमोल राठोड यांनी केले या कार्यक्रमाला शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते.