नेकनूर (रिपोर्टर)ः- बीड तालुक्यातील नेकनूर, लिंबागणेश, नांदुर फाटा सह आदी परिसरात झाडांची अनाधिकृतपणे तोड केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.वनविभाग आणि झाडे तोडणारांची मीलिभगत असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. याला कारणीभूत फक्त वनविभाग आहे. वनविभागाच्या भ्रष्ट अधिकार्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नेकनूर हद्दीतून झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. लाकडाचे व्यापारी लपून छपून झाडे तोडून आणत आहेत. झाडांची सर्रास कत्तल होत असतांनाही वनविभाग बघ्याची भुमिका घेत आहे. वनविभाग आणि लाकडांचे व्यापारी यांच्यामध्ये मिलिभगत असल्यामुळेच झाडांची तोड होवू लागली. नेकनूर, लिंबागणेश, नांदूरफाटा यासह आदी परिसरातून दररोज तोडलेल्या लाकडाच्या गाड्या येत आहेत.जिल्ह्यात आधीच वनक्षेत्र कमी आहे. वनक्षेत्र कमी असल्यामुळे पर्यावरणाचे दुष्परिणाम दिसून येवू लागले. वनक्षेत्र वाढविण्याऐवजी ते कमी होवू लागल्याने याला वनविभाग सर्वस्वी जबाबदार आहे. वनविभागाने ठोस भुमिका घेतली तर झाडे तोडण्यावर प्रतिबंध येवू शकतो. पण वनविभाग भ्रष्ट वृत्तीचे असल्याने झाडाची सर्रास कत्तल होवू लागली.