ह.भ.प. नामदेव शास्त्रींचे कीर्तन सुरू
माजी मंत्री धनंजय मुंडे पवनहंस विमानतळावर अडकले
शिरूर, (रिपोर्टर)ः- भगवान गडाचा नारळी सप्ताह गेल्या सात दिवसापासून शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे मोठ्या भक्तीभावासह उत्साहात साजरा होत आहे. आज या सप्ताहाच्या समाप्ती दिनी पिंपळनेर येथे भगवान बाबांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने उपस्थित झाले असून भगवान गडाचे मठाधिपती ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज यांचे काल्याचे किर्तन सुरू आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार होते. मात्र सकाळी 10 वाजल्यापासून ते मुंबई येथील पवनहंस विमानतळावर पिंपळनेरकडे कुच करण्यासाठी थांबले मात्र हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास काही तांत्रिक अडचणीमुळे परवानगी मिळाली नाही. त्यामुळे जड अंतःकरणाने दौरा रद्द करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हंटले. श्रीक्षेत्र भगवानगड आदरणीय महंत ह.भ.प. डॉ.नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांनी हदयपुर्वक क्षमा मागतो असेही मुंडेंनी सोशल मिडीयावर पोस्ट केली.

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्री भगवान बाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहास गेल्या सात दिवसापासून सुरूवात झाली आहे. आज या सप्ताहाची सांगता गडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होत आहे. सांगता सोहळ्यासाठी शिरूर तालुक्यातूनच नव्हे तर अखंड बीड जिल्ह्यातून संत भगवान बाबांचे अनुयायी पिंपळनेरमध्ये डेरे दाखल झाले आहेत. लाखोंची गर्दी या सप्ताहाला दिसून येत असून दुपारी 1.00 वाजता ह.भ.प.नामदेव शास्त्री महाराज हे किर्तनासाठी उभे राहिले. या कार्यक्रमाला माजी मंत्री ना.धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार होते. मात्र हेलिकॉप्टर उड्डाणाबाबत परवानगी मिळाली नसल्याने ते कार्यक्रमाला येवू शकले नाही. धनंजय मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकली असून ते त्या पोस्टमध्ये म्हणतात मी पिंपळनेर ता.शिरूर कासार येथील संत श्री भगवान बाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहास येण्यासाठी सकाळी साधारण 10 वाजल्यापासून मुंबई येथील पवनहंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजुनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागत आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको. म्हणून या बाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे. श्रीक्षेत्र भगवान गड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प.डॉ.नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हदयपुर्वक क्षमा मागतो असेही ना.मुंडेंनी म्हंटले.







